नंदीग्राम'ला अजनीत प्रायोगिक थांबा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

नागपूर : प्रवाशांच्या मागणीनुसार तीन महत्त्वपूर्ण प्रवासी रेल्वेगाड्यांना तीन वेगवेगळ्या स्थानकांवर प्रायोगिक स्वरूपात थांबा देण्यात आला आहे. नंदीग्राम एक्‍स्प्रेसला अजनीत, जोधपूर-पुरी एक्‍स्प्रेसला काटोल तर श्रीगंगानगर-हुजूर साहेब नांदेड एक्‍स्प्रेसला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात आला. या गाड्या पुढील सहा महिने केवळ दोन मिनिटांसाठी संबंधित स्थानकांवर थांबतील. 11401/11402 मुंबई-नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्‍स्प्रेस दुपारी 3.53 वाजता तसेच सकाळी 6.10 वाजता अजनी स्थानकावर थांबेल.

नागपूर : प्रवाशांच्या मागणीनुसार तीन महत्त्वपूर्ण प्रवासी रेल्वेगाड्यांना तीन वेगवेगळ्या स्थानकांवर प्रायोगिक स्वरूपात थांबा देण्यात आला आहे. नंदीग्राम एक्‍स्प्रेसला अजनीत, जोधपूर-पुरी एक्‍स्प्रेसला काटोल तर श्रीगंगानगर-हुजूर साहेब नांदेड एक्‍स्प्रेसला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात आला. या गाड्या पुढील सहा महिने केवळ दोन मिनिटांसाठी संबंधित स्थानकांवर थांबतील. 11401/11402 मुंबई-नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्‍स्प्रेस दुपारी 3.53 वाजता तसेच सकाळी 6.10 वाजता अजनी स्थानकावर थांबेल. 20814 जोधपूर-पुरी एक्‍स्प्रेस दुपारी 12.42 वाजता आणि 20813 पुरी-जोधपूर एक्‍स्प्रेस दुपारी 12.02 वाजता काटोल स्थानकावर थांबेल. 17264 श्रीगंगानगर-हुजूर साहेब नांदेड एक्‍स्प्रेस रात्री 8.24 वाजता आणि 17263 हुजूर साहेब नांदेड-श्रीगंगानगर एक्‍स्प्रेस दुपारी 2.34 वाजता शेगाव स्थानकावर थांबेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stop at Nandigram express