सलग चार दिवसानंतर पावसाचा विसावा, शेती कामांना येणार वेग

विवेक मेतकर
शुक्रवार, 13 जुलै 2018

अकोला : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विसावा घेतला असून खरीप पिकांची खोळंबलेली मशागत सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठी किमान पाच ते सहा दिवसांची उघडीप असणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यातील धरणाच्या जलसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहा जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरु झाले. त्याचे वाहन बेडुक हे आहे. त्यामुळे या नक्षत्रात आणखी जोरदार पावसाची शक्यता आहे.

अकोला जिल्ह्यात सरासरी 31.2 मिलिमीटर, तर वाशीममध्ये सरासरी 35.37 मिलिमीटर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्‍यात अतिवृष्टी झाली असून, येथे सर्वाधिक 70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जवळपास 20 ते 25 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर सावत्रिक पावसाचे पुनरागमन झाले आहे.

मागील चार दिवसांत बुलडाण्यातील काही तालुके वगळता वऱ्हाडात सर्वदूर चांगला पाऊस झाला. मागील 24 तासांत अकोला, वाशीम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू असून, बुधवार आणि गुरुवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. संततधार पावसामुळे शेतीतील सर्व कामे आता ठप्प झाली आहेत. सर्वत्र पाण्यामुळे पेरणीची कामे रखडली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

पावसामुळे जलयुक्तची कामे तुडुंब
मागील तीन दिवसांतील पावसाचा चांगला फायदा पिकांना जसा झाला, तसाच फायदा या वर्षात झालेल्या जलयुक्तच्या कामांनाही झाला आहे. बंधारे, चर, पाण्याने तुडुंब भरू लागले आहेत. दररोज हजारो लिटर पाणी जमिनीत जिरत आहे.

Web Title: stop rain after 4 days farmers start working