Maharashtra vidhansabha 2019 : कोराडीत बावनकुळे समर्थकांचा रास्ता रोको 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

कामठी (जि. नागपूर) : राज्याचे ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले होते. कामठी येथे रस्ता रोखून त्यांनी आपला रोष व्यक्त केला. एवढेच नव्हे तर भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांचीसुद्धा गाडी तहसील कार्यालयासमोर रोखून धरली होती. 

बावनकुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आधीपासूनच तयारी झाली होती. शक्तिप्रदर्शन करून बावनकुळे यांची ताकद दाखविली जाणार होती. शुक्रवारी त्यांचे नाव जाहीर होईल आणि उमेदवारी अर्ज भरायला बावनकुळे यातील याकरिता कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर गर्दी केली होती. ते मुख्यमंत्र्यांसोबत होते. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून येणार असल्याची चर्चा मतदारसंघात होती. मात्र, दुपारी दोन वाजले तरी उमेदवारी जाहीर केली जात नसल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटायला लागला. यातच वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावरून धडकत असल्याने असंतोषात वाढ होत चालली होती. 
पोतदार व देशपांडे एबी फॉर्म घेऊन आले 
अनिश्‍चितेच्या वातावरणात जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार व श्रीकांत देशपांडे बंद लिफाफ्यात एबी फॉर्म घेऊन तहसील कार्यालयात आले. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यास अवघे 15 मिनिटे शिल्लक होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्याचवेळी अनिल निधान यांना फोन करून तहसील कार्यालयात बोलावण्यात आले. तत्पूर्वीच जिल्हा परिषदेचे माजी सभापती टेकचंद सावरकर अचानक आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता आले. दोघांनीही अर्ज दाखल केले. सोबत एबी फॉर्म जोडले. फॉर्मवर पहिल्या क्रमांकावर सावरकर यांचे तर दुसऱ्या क्रमांकावर निधान यांचे होते. हे समजताच कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोतदार यांची गाडी रोखली व विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop the supporters' way