Video : पाऊस आला धावून, शेतकऱ्यांची स्वप्ने गेली वाहून...मोठे नुकसान

प्रशिक मकेश्वर.
बुधवार, 18 मार्च 2020

अमरावती जिल्ह्यासह काल तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला. दहा दिवसानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्‍यातील गहू व हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

तिवसा (जि. अमरावती)  : होळीनंतर उन्हाचा तडाखा वाढतो, यंदा मात्र होळीपासूनच वातावरण ढगाळ दिसत होते आणि काल तर विदर्भाला पावसाने झोडपून काढले. अवकाळी पावसाला पहिला बळी ठरतो बळीराजा. या पावसाने शेतातील उभी पिके लोळवली आणि शेतकरी हवालदिल झाला.
अमरावती जिल्ह्यासह काल तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाला. दहा दिवसानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये तालुक्‍यातील गहू व हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

 

दि.18 मार्च रोजी 9 वाजताच्या दरम्यान गावात गारपिट झाली तर अवकाळी झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे. रब्बी हंगामातील गहु, हरभरा पिकांसह फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर रात्री बंद झालेल्या पावसाचे आज सकाळी पुन्हा आगमन झाले, तर सकाळपासून ढगाळ वातावरण असून आज गारपिटीसह पुन्हा पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या दहशतीमुळे पुण्या मुंबईतील विद्यार्थ्यांची घरवापसी, पालकांचा जिवात जीव

अमरावती जिल्ह्यातील काही भागात सायंकाळी तर काही ठिकाणी रात्री विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती त्यात गहू व हरभरा पिकांना फटका बसला होता. आज पुन्हा गारपीटीसह वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले तर वादळी पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे, तर आज सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण सुरू असून पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे
नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: storm rain in Amarawati district