तीन दिवसांपासून मन्नू स्ट्रेचरवर पडून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर ः मन्नू टेकाम, मूळचा बालाघाट येथील. या गरीब रुग्णाला पाठीचा कणा आणि कमरेचा त्रास आहे. पत्नीने बालाघाट येथून मेडिकलमध्ये उपचारासाठी आणले. सीटी स्कॅन काढण्याचा सल्ला देत मेडिकलमधून डॉक्‍टरांनी सुपरमध्ये रेफर केले.
मात्र सुपर स्पेशालिटीत डॉक्‍टरांना पूर्वी काढलेल्या सीटी स्कॅनची सीडी न दाखविल्यामुळे मन्नू तीन दिवसांपासून स्ट्रेचरवर पडून आहे. याला आपण कोणत्या विभागात उपचारासाठी आलो, हेदेखील माहीत नाही.

नागपूर ः मन्नू टेकाम, मूळचा बालाघाट येथील. या गरीब रुग्णाला पाठीचा कणा आणि कमरेचा त्रास आहे. पत्नीने बालाघाट येथून मेडिकलमध्ये उपचारासाठी आणले. सीटी स्कॅन काढण्याचा सल्ला देत मेडिकलमधून डॉक्‍टरांनी सुपरमध्ये रेफर केले.
मात्र सुपर स्पेशालिटीत डॉक्‍टरांना पूर्वी काढलेल्या सीटी स्कॅनची सीडी न दाखविल्यामुळे मन्नू तीन दिवसांपासून स्ट्रेचरवर पडून आहे. याला आपण कोणत्या विभागात उपचारासाठी आलो, हेदेखील माहीत नाही.
गरिबांच्या आवाक्‍यात खासगीतील उपचार शक्‍य नसल्याने या गरिबांची धाव सुपर स्पेशालिटीकडे आहे. दर दिवसाला एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी येथे होते. हृदयविकार, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्युरोलॉजी, नेफ्रोलाजी, सीव्हीटीएस अशा अनेक आजारांवर सुपर वरदान ठरत आहे. परंतु अलीकडे गरिबांच्या जीवाची येथे किंमत केली जात नाही. नाव सुपर स्पेशालिटी असले तरी येथे सुपर उपचार होत नसल्याचे चित्र दिसते. मन्नू आठ दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये उपचारासाठी आला. यानंतर 7 ऑक्‍टोबरला त्याला सुपरमध्ये रेफर केले. दरम्यान, पूर्वी सीटी स्कॅन काढल्याचे मन्नूने डॉक्‍टरांना सांगताच येथील डॉक्‍टरांनी रिपोर्ट मागितला. रिपोर्टसाठी रुग्णाचा नातेवाईक बालाघाटला गेला. रिपोर्ट आणला. डॉक्‍टरांनी बघितला. मात्र आता सुपरच्या डॉक्‍टरांनी पूर्वी काढलेल्या "सीटी स्कॅन'ची सीडी आणायला सांगितले. मन्नूच्या पत्नीजवळ ना पैसा ना नातेवाईक. आता कोण बालाघाटला जाईल आणि सीडी आणेल? दोनशे किलोमीटरचे अंतर कापून दर दिवसाला जाणे शक्‍य आहे? यामुळे उपचार तर सोडा, त्याला सीडी आण असे सांगण्यात आले. यामुळे बिचारा मन्नू सुपरच्या आवारात स्ट्रेचरवर पडून आहे. अशी सुपर स्पेशालिटीतील डॉक्‍टरांची किमया... आता सांगा... याला सुपर म्हणायचे का?

सामाजिक कार्यकर्ते हरवले...
सुपर स्पेशालिटीत तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या काळात तयार झालेले मदतकेंद्र दिसत नाही. या मदत केंद्रात सामाजिक कार्यकर्ता बसून रुग्णांच्या तक्रारी ऐकत होता. परंतु सामाजिक कार्यकर्ते अर्थात सामाजिक वैद्यकीय अधीक्षक हरवले असल्याचे चित्र दिसून येते.

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे उपचारासाठी येतात. यांच्यावर उपचार व्हावेत. मन्नू टेकामला डॉक्‍टरांनी बघितले असेल. परंतु यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर काय ते सांगता येईल. मात्र जुनी सीटी स्कॅनची सीडी बघितल्यास सुस्पष्ट निदान होते.
- डॉ. मिलिंद फुलपाटील, विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी, नागपूर.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: streacher