तणावामुळे रोखपालाचा बॅंकेतच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे बॅंकांमध्ये गर्दी उसळलेली आहे. याचा ताण कर्मचाऱ्यांवर येत असून, शुक्रवारी अंबाझरी मार्गावरील भारतीय स्टेट बॅंकेचे रोखपाल आर. व्ही. राजेश (51) यांना बॅंकेत काम करत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. राजेश हे माजी सैनिक होते.

राजेश यांनी बॅंकेत येताच काम सुरू केले. बॅंकेत पैसे काढण्यासाठी व बदलण्यासाठी गर्दी होती. काम सुरू असतानाच दुपारी 12 च्या सुमारास अस्वस्थ वाटत असल्याचे त्यांनी सहकाऱ्यांना सांगितले. काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान राजेश यांचे निधन झाले. बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पूर्वी हवाई दलात होते. 2009 मध्ये ते "एसबीआय'मध्ये रुजू झाले होते.

राजेश यांची प्रकृती ठीक नसतानाही बॅंकेतील गर्दी लक्षात घेऊन ते कामावर आले होते. यांच्या अचानक मृत्यूमुळे सहकारी दुःखात असले, तरी बॅंकेत ग्राहकांची गर्दी त्यांनी काम थांबू दिले नाही.

आम्हाला सहकार्य करा
सर्वांच्या हितासाठी आम्ही बॅंकर्स कार्यरत आहोत. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही दिवसरात्र एक करत आहोत. ग्राहकांनीही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न न करता आम्हाला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन राजेश यांचे सहकारी आणि "एसबीआय'च्या अंबाझरी शाखेत रोखापाल कमल रंगवानी यांनी केले.

Web Title: Stress due to the death of the cashier at the bank