परतवाड्यात तणावपूर्ण शांतता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

परतवाडा (जि. अमरावती) : शहरात सोमवारी (ता.30) घडलेल्या तिहेरी खुनाच्या घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता होती. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एकाचा दफनविधी पोलिस बंदोबस्तात सोमवारी रात्रीच पार पडला. आज, मंगळवारी दुपारी दुसऱ्या मृताचा दफनविधी तर तिसऱ्या मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, उशिरा मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहरातील काही भागात पुन्हा दगडफेकीच्या घटना घडल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे. शहरात लावण्यात आलेली संचारबंदीची मुदत आज दुसऱ्या दिवशी कायम ठेवण्यात आली.

गुरुनानकनगर भागातील टिंबर डेपोमध्ये जुगाराच्या वादातून सोमवारी (ता. 30) दुपारी दीडच्या सुमारास श्‍याम रघुवीर खोलापुरे (नंदवंशी) यांच्यावर चाकू व कोयत्याने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, उपद्रवींनी गुजरीबाजार, श्‍याम टॉकीज, गटरमलपुरा भागात धुमाकूळ घालत दुकानांची तोडफोड आणि मारहाण केली. लोखंडी पाइप, कोयता, काठ्यांनी चढविलेल्या हल्ल्यात मोहंमद अतिक मोहंमद रफीक (वय 40) आणि सैफअली मोहंमद कलाम (वय 21) गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले, तर मोहंमद फैजन मोहंमद अफसर, मोहंमद नईम शेख करीम गंभीर जखमी झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधित ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी परतवाडा शहरात संचारबंदी लागू केली.
सोमवारी (ता. 30) रात्री 12.30 च्या सुमारास सैफ अली मोहंमद कलाम याच्यावर पोलिस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. आज, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास श्‍याम खोलापुरे याच्यावर हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला. त्या पाठोपाठ दुपारी तीनच्या सुमारास बैतुल मार्गावरील कब्रस्तानात मोहंमद अतिक मोहंमद रफीक यांच्यावर दफनविधी करण्यात आला. यावेळीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. शहरात तणावपूर्ण शांतता असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stressful silence in the Paratwada