अमरावतीत लॉकडाउन 22 मेपर्यंत वाढवला; सर्व प्रकारची दुकानं राहणार बंद

अमरावतीत लॉकडाउन 22 मेपर्यंत वाढवला; सर्व प्रकारची दुकानं राहणार बंद

अमरावती : जिल्ह्यातील वाढती कोरोना (Amravati Corona Update) रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउनचा कालावधी आता 22 मे पर्यंत वाढविला आहे. यापूर्वी 15 मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता, मात्र रुग्णसंख्येत घट झाली नसल्याने निर्बंध वाढविण्यात आले आहे.(Strict lockdown extended in Amravati till 22 may)

अमरावतीत लॉकडाउन 22 मेपर्यंत वाढवला; सर्व प्रकारची दुकानं राहणार बंद
मंत्र्यांनी चक्क प्रशासनालाच ठरवलं खोटं; म्हणतात, 'सोयाबीन नुकसानाच्या प्रस्तावाबाबत अनभिज्ञ'

सर्व प्रकारचा किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, खाद्यपेय विक्रेता ,सर्व प्रकारची मद्यदुकाने व बार या आस्थापनांना सकाळी 7 ते दुपारी तीन या वेळेत केवळ घरपोच सेवा देता येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत दुकाने सुरू राहणार नाहीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरेन्ट, खानावळीतून पार्सल सेवा सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत देता येईल.

बाजार समित्यांना सूट नाहीच

जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या, भाजी मार्केट, आठवडी बाजार या कालावधीत बंदच राहणार आहेत. तथापि शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने सकाळी 7 ते दुपारी तीन या वेळेत घरपोच सेवेव्दारे दिली जाऊ शकतील. कृषी सेवा केंद्र दुकानदार व शेतकऱ्यांचे व्हॉटसऍप ग्रुप तयार करून टोकन सिस्टीमचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

अमरावतीत लॉकडाउन 22 मेपर्यंत वाढवला; सर्व प्रकारची दुकानं राहणार बंद
यवतमाळमध्ये उद्यापासून १५ दिवस कडक संचारबंदी; जाणून घ्या नियम

लग्न समारंभासाठी 15 ची मर्यादा कायम

लग्न समारंभासाठी पूर्वीचीच 15 ही उपस्थिती संख्या कायम ठेवण्यात आली आहे. याशिवाय मालवाहतूक करताना दोनपेक्षा अधिक व्यक्तींना वाहनात परवानगी नसणार आहे. तसेच परराज्यांतून येणाऱ्या वाहतूकदारांना 48 तासांमध्ये निर्गमित करण्यात आलेला आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक राहणार आहे.

.(Strict lockdown extended in Amravati till 22 may)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com