पाच महिन्यांच्या "सनवी'साठी धडपड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

वाडी/दवलामेटी(जि.नागपूर ) : रामजी आंबेडकरनगरातील विकी आणि प्रिया ढोके यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर पाच महिन्यांपूर्वी सानवी नावाचे एक गोंडस फूल फुलले. मात्र, चिमुकलीला किडनीचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्‍टरांनी उपचारासाठी 20 लाख रुपयांचा खर्च सांगितला. इतकी रक्‍कम जमविण्यास नाइलाज असल्यामुळे निराश झालेल्या ढोके दाम्पत्याला परिसरातील युवा विकास क्रांती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून जमविलेले पैसे त्यांच्याकडे सुपूर्त केले. ढोके दाम्पत्यांना सात ते आठ वर्षांनंतर मुलगी झाली. सानवी असे तिचे नाव ठेवले.

वाडी/दवलामेटी(जि.नागपूर ) : रामजी आंबेडकरनगरातील विकी आणि प्रिया ढोके यांच्या सुखी संसाराच्या वेलीवर पाच महिन्यांपूर्वी सानवी नावाचे एक गोंडस फूल फुलले. मात्र, चिमुकलीला किडनीचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्‍टरांनी उपचारासाठी 20 लाख रुपयांचा खर्च सांगितला. इतकी रक्‍कम जमविण्यास नाइलाज असल्यामुळे निराश झालेल्या ढोके दाम्पत्याला परिसरातील युवा विकास क्रांती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून जमविलेले पैसे त्यांच्याकडे सुपूर्त केले. ढोके दाम्पत्यांना सात ते आठ वर्षांनंतर मुलगी झाली. सानवी असे तिचे नाव ठेवले. परंतु, तिला असलेल्या किडनीच्या आजारामुळे ढोके दाम्पत्यावर दुःखाचे सावट पसरले. अत्यंत गरीब परिस्थिती असल्याने 20 लाख रुपये कुठून जमविणार, असा प्रश्न ढोके कुटुंबाला भेडसावत होता. त्या अनुषंगाने प्रियाने युवा विकास क्रांती मंडळाचे अध्यक्ष आणि वाडी नगर परिषद पत्रकार संघाचे सदस्य नागेश बोरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना व्यथा सांगितली. युवा विकास क्रांती मंडळाचे अध्यक्ष नागेश बोरकर, उपाध्यक्ष रोहित राऊत, स्नेहल वासनिक, आकाश वाघमारे यांनी त्वरित आठवा मैल, तिजारे ले आउट परिसरातून वर्गणी गोळा करून प्रिया ढोके यांची भेट घेतली. थोडीफार आर्थिक मदत केली. पुढे आणखी मदत करण्यासाठी वाडी परिसरातून वर्गणी गोळा करू अशी माहिती दिली. तसेच सर्व नागरिकांना युवा विकास क्रांती मंडळाकडून मदतीसाठी आवाहन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Struggle for a five-month "sunvee"