आई वाट पहात राहिली अन्‌ चिमुकला देवाघरी गेला...

सचिन शिंदे 
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

परसोडा येथील फुलसिंग राठोड यांची मुलगी वैशाली हिचे लग्न महागाव तालुक्‍यातील लोकरवाडी येथील रणजीत पवारसोबत झाले होते. पण रणजीत कामानिमित्त पुणे-मुंबईत राहत असल्याने वैशाली तिच्या दोन्ही मुलांना घेऊन परसोडा येथे वडिलांकडेच रहात होती. वैशालीचे दोन्ही मुलं आर्णी येथील स्वामी विवेकानंद शाळेत शिकत होते. मोठा मुलगा चौथ्या वर्गात, तर लहान समर्थ दुसऱ्या वर्गामध्ये शिकत होता. दोघेही रोज ऑटोने ये-जा करायचे. 

आर्णी (जि. यवतमाळ) : सायंकाळचे सहा वाजले तरीही समर्थ शाळेतून घरी आला नव्हता. रोज सव्वा पाच, साडेपाच पर्यंत घरी येणारा समर्थ अजून घरी आला नाही, म्हणून आई बिचारी चातकाप्रमाणे त्याची वाट पहात होती. पण सार्थक तर आला नाहीच. आली ती त्याच्या अपघाती मृत्यूचीच बातमी. बालकदिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने आर्णी-महागाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

तालुक्‍यातील परसोडा येथील फुलसिंग राठोड यांची मुलगी वैशाली हिचे लग्न महागाव तालुक्‍यातील लोकरवाडी येथील रणजीत पवारसोबत झाले होते. पण रणजीत कामानिमित्त पुणे-मुंबईत राहत असल्याने वैशाली तिच्या दोन्ही मुलांना घेऊन परसोडा येथे वडिलांकडेच रहात होती. वैशालीचे दोन्ही मुलं आर्णी येथील स्वामी विवेकानंद शाळेत शिकत होते. मोठा मुलगा चौथ्या वर्गात, तर लहान समर्थ दुसऱ्या वर्गामध्ये शिकत होता. दोघेही रोज ऑटोने ये-जा करायचे. 

दहा मिनिटांत घरी येणारा समर्थ परतलाच नाही 
नेहमी सारखे सर्व मुलं ऑटोने गुरुवारी शाळा सुटल्यावर घरी परत येत होते. शाळेपासून जवळच असलेल्या शवविच्छेदन गृहाजवळ समर्थचा हात अचानक सुटला आणि तो ऑटोतून बाहेर रोडवर पडला. त्याच्या डोक्‍याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे त्याला प्रथम आर्णी ग्रामीण रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार करून त्याला यवतमाळला नेण्यात आले. पण तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोज शाळा सुटल्यावर दहा मिनिटांत घरी जाणारा चिमुकला समर्थ बालकदिनाच्याच दिवशी सर्वांना सोडून देवाघरी गेला. तो कधीही न परतण्यासाठी. 

कोण देणार लक्ष? 
अशा घटना रोज कुठे ना कुठे घडत असतात. मुलांना ऑटोत जनावरांसारखे कोंबून नेल्या जाते. ना त्याकडे पोलिसांचे लक्ष व ना परिवहन विभागाचे. याला जबाबदार कोण? अशा घटनांना आळा केव्हा बसेल? असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने सर्वांनाच पडतात. पण, त्यांची उत्तरे कधीच मिळत नाही. मात्र तोवर समर्थसारख्या चिमुकल्यांचे जीव रोज रस्त्यावर जात राहतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student dead in autorickshaw accident at yavatmal district