तहानेने व्याकूळ झालेल्या विद्यार्थिनीचा अखेर मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवडा येथील सभेदरम्यान तहानेने व्याकूळ झाल्यानंतर अत्यवस्थ झालेल्या विद्यार्थिनीचा नागपूर येथील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. मेंदूमध्ये रक्‍तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे तिच्यावर उपचार करणारे प्रख्यात मेंदूतज्ज्ञ डॉ. प्रमोद गिरी यांनी सांगितले.
क्षितिजा बाबूराव गुटेवार (वय 12, रा. शिवाजी वॉर्ड, पांढरकवडा) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

क्षितिजा ही येथील जिल्हा परिषदेच्या विद्यालयात सातवीत शिक्षण घेत होती. पांढरकवडा येथे शनिवारी आयोजित स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांच्या महामेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या मेळाव्यासाठी शिवाजी वॉर्डातील काही महिला सकाळी आठलाच ऑटोरिक्षाने गेल्या होत्या. त्यांच्यासोबत क्षितिजा, तिची आई सुनीता व सातवर्षीय भाऊ कृष्णासुद्धा गेला होता. सकाळी 11ची सभा असल्याने ऊनही होते. त्या बसलेल्या ठिकाणी जवळपास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे क्षितिजा तहानेने व्याकूळ झाली. दरम्यान, तिला उपचारासाठी पांढरकवडा येथील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने तिला नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना, आज तिचा मृत्यू झाला. दरम्यान, तिच्यावर उपचार करणारे डॉ. प्रमोद गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मेंदूमध्ये रक्‍तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबीयांनी शवविच्छेदनास नकार दिल्याने तिच्यावर पांढरकवडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच या प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: student die due to bleeding in brain