वाहनाच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

यवतमाळ : शाळा सुटल्यानंतर आईसह घराकडे जात असताना भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, आई जखमी झाली. ही घटना मंगळवारी (ता.20) पिंपळगाव परिसरात घडली. विद्यार्थिनीच्या मृत्युमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वराली गिरिधर चन्ने (वय दहा, रा. दोनाडकर ले-आउट, यवतमाळ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. परिसरातील वेदधारिणी विद्यालयात ती पाचवीत शिकत होती. शाळा सुटल्यावर आईसोबत पायदळ घराकडे जात होती.

दरम्यान, भरधाव झायलो वाहनाने स्वरालीला धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ज्या ठिकाणी अपघात झाला ते स्थळ मुळीच अपघाताचे नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी चालकाविरुद्ध रोष व्यक्त केला. या प्रकरणी नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student dies in vehicle collision