यंदा ड्रॉप घेण्याची बळावतेय मानसिकता, ऑनलाइन अध्यापनामुळे अभ्यास झाला कमी

student may take break in twelve due to online study
student may take break in twelve due to online study

अमरावती : कोरोना संक्रमणामुळे शाळा व महाविद्यालयांना लागलेले टाळे, अनियमित वर्ग आणि ऑनलाइन शिक्षण, यामुळे अभ्यास कमी झाल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळेच विशेषतः इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये यंदा ड्रॉप घेण्याची मानसिकता बळावल्याचे समोर येऊ लागले आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण किती असेल हे परीक्षेच्या वेळीच स्पष्ट होणार आहे. 

अमरावती विभागात इयत्ता दहावीचे १ लाख ६३ हजार, तर बारावीच्या परीक्षेला १ लाख ३८ हजार विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. कोरोनाचे सावट असूनही गेल्यावर्षी ऑफलाइन परीक्षा सुरळीत पार पडू शकल्यात. मात्र, यंदा फेब्रुवारीत पुन्हा आलेल्या कोरोना उद्रेकामुळे परीक्षा अडचणीत आल्या आहेत. या परीक्षा ऑनलाइन घेण्यातील तांत्रिक अडचणी बघता परीक्षा मंडळांने परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानुसारच परीक्षा होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. इयत्ता दहावीची परीक्षा २९ एप्रिल तर इयत्ता बारावीची २३ एप्रिलपासून सुरू होत आहे. 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ विद्यार्थ्यांसाठी आव्हानांचे ठरले आहे. कोरोना संक्रमणामुळे शाळा व महाविद्यालय नियमित सुरूच होऊ शकल्या नाहीत. ऑनलाइन अध्यापनाचा मार्ग निवडण्यात आला. पण, त्याचा लाभ इंटरनेटची कनेक्‍टिविटी व मोबाईलची उपलब्धता यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पुरेसा मिळू शकला नाही. दहावी व बारावीत चांगले गुण मिळवून पुढे करिअर करायचे तर बेस पक्का हवा. तोच यंदा कच्चा राहिला आहे. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये, विशेषतः इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये ड्रॉप घेण्याची मानसिकता निर्माण झाली आहे. 

परीक्षा द्यायची की नाही, हा निर्णय विद्यार्थी परीक्षा देताना घेतात. एखाद्या पेपरमध्ये अपेक्षित गुण मिळणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर परीक्षेच्या वेळी विद्यार्थी ड्रॉप घेण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे परीक्षा होत असताना किती अर्ज येतात त्यानंतरच आकडा स्पष्ट होऊ शकेल. 

- शरद गोसावी, अध्यक्ष, अमरावती विभागीय परीक्षा मंडळ 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com