आश्रमशाळेतील नववीची विद्यार्थिनी झाली प्रकल्प अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 March 2020

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोथळी गावच्या शासकीय आश्रमशाळेत नववी इयत्तेत शिकणाऱ्या अंकिता शेळके या विद्यार्थीनीला एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प अकोला कार्यालयात एक दिवसाची प्रकल्प अधिकारी होण्याचा मान मिळाला. जागतिक महिला दिनाचे (8 मार्च) औचित्य साधून सर्वत्र महिला विशेष सप्ताह राबविण्यात येत आहे. याच निमित्ताने शुक्रवारी (ता. 6) एक दिवसाचा प्रकल्प अधिकारी म्हणून आश्रमशाळेतील विद्यार्थीनीची नेमणूक करण्यात आली होती. 

अकोला : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोथळी गावच्या शासकीय आश्रमशाळेत नववी इयत्तेत शिकणाऱ्या अंकिता शेळके या विद्यार्थीनीला एकात्मिक आदिवाशी विकास प्रकल्प अकोला कार्यालयात एक दिवसाची प्रकल्प अधिकारी होण्याचा मान मिळाला. जागतिक महिला दिनाचे (8 मार्च) औचित्य साधून सर्वत्र महिला विशेष सप्ताह राबविण्यात येत आहे. याच निमित्ताने शुक्रवारी (ता. 6) एक दिवसाचा प्रकल्प अधिकारी म्हणून आश्रमशाळेतील विद्यार्थीनीची नेमणूक करण्यात आली होती. 

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र निरनिराळे उपक्रम राबविण्यात येत असून आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गतही अभिनय उपक्रम राबविण्यात येत आहे. अकोला एकात्मिक विकास प्रकल्पने देखील असाच एक स्तुत्य उपक्रम शुक्रवारी (ता. 6) राबविला. प्रकल्पाच्या अकोला कार्यालयात कोथळी गावच्या शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या अंकिता शेळके या विद्यार्थनीची नेमणून एक दिवसीय प्रकल्प अधिकारी म्हणून करण्यात आली.

हेही वाचा - लैगीक शोषणासाठी त्याने बांधली होती छतावर झोपडी

अंकिता शुक्रवारी (ता. 6) सकाळीच कार्यालयात दाखल झाली. त्यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या एक दिवसीय विद्यार्थीनी प्रकल्प अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी अकोलाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांनी अंकिताचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करत एक दिवसाचा प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार सोपवला. यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंकिताला शासकीय कामकाजाची आणि पदाच्या जबाबदाऱ्यांची माहिती दिली. अंकिताने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवादही साधला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a student of ninth class become one day tribal development project officer