कमी टक्‍के मिळाले म्हणून विद्यार्थिनीची आत्महत्या

file photo
file photo

नागपूर : कमी टक्‍के मिळाले म्हणून दहावीच्या विद्यार्थिनीने चैताली किरण जांभूळकर (16, रा. सदर, हसन गॅरेज एरिया) हिने पेट्रोल पिऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. दहावीत चैतालीला 48 टक्‍के गुण मिळाले. पेपर चांगले सोडविल्यानंतरही अपेक्षित टक्‍केवारी मिळाली नाही. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर चैताली नैराश्‍यात होती. चार दिवसांपासून ती घरात तणावात वावरत होती. तिच्या वागण्यात बदल झाल्यामुळे वडिलाने समजूतही घातली. अभ्यासात कमकुवत असलेल्या मैत्रिणींना चैतालीपेक्षा जास्त गुण मिळाले होते. त्यामुळे मैत्रिणींना अकरावीत चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल आणि आपल्याला कोणत्याही कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घ्यावे लागेल, असा समज तिचा होता. त्यामुळे तिने शनिवारी दुपारी तीनला घरी कुणी नसताना पेट्रोल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ती बेशुद्धावस्थेत पडलेली दिसल्यामुळे रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी तिचा मृत्यू झाला. सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
इंजिनिअर बनण्याचे स्वप्न
चैतालीला बारावीनंतर अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायचा होता. तिला इंजिनिअर बनून वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. मात्र, दहावीत कमी गुण मिळाल्याने चैतालीने आत्महत्येचा पर्याय निवडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com