अकोल्यात कॉपीबहाद्दर सात विद्यार्थी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

अकोला - माध्यमिक शालांत परीक्षेत मंगळवारी (ता. 14) बीजगणिताच्या पेपरला जिल्ह्यात सात परीक्षार्थी कॉपी करताना आढळले. कॉपीमुक्त परीक्षेसाठी नियुक्त भरारी पथकांनी या सातही कॉपीबहाद्दरांना निलंबित केले. शिवाजी विद्यालय राजंदा केंद्रावर कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पथकाने निलंबित केले. तर बाबूजी तायडे विद्यालय आगेखेड (ता. पातूर) परीक्षा केंद्रावर कॉपी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या पथकाने निलंबित केले. बेलखेड (ता. तेल्हारा) येथील नूतन विद्यालयात विभागीय व्यवसाय मार्गदर्शन अधिकाऱ्यांच्या पथकाला एक विद्यार्थी कॉपी करताना सापडला.
Web Title: student suspend in exam cheat