हा काय प्रकार? एकच विद्यार्थी असल्याने प्रश्‍नपत्रिका पाठवली नाही

file photo
file photo

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेत बुधवारी (ता. 16) पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच तयार नसल्याने विद्यार्थिनीला परीक्षेला मुकावे लागले. मात्र, या परीक्षेत ती एकमेवर विद्यार्थिनी असल्यानेच हा प्रकार घडल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. या विद्यार्थिनीची नव्याने परीक्षा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या हिवाळी परीक्षांचा पहिला टप्पा सुरू आहे. या टप्प्यामध्ये उन्हाळी परीक्षेत काही विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर महिला अध्ययन केंद्राच्या चौथ्या सत्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाचा पेपर बुधवारी (ता. 16) घेण्यात येणार होता. हा पेपर देण्यासाठी विद्यार्थिनी केंद्रावर पोहोचली. तिला उत्तरपत्रिकाही देण्यात आली. मात्र, काही वेळातच या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील परीक्षा केंद्राने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे संपर्क साधला. त्यात या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले. या विषयाला फार विद्यार्थी नसल्याने प्रश्‍नपत्रिका तयार केले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. 
नियमानुसार एकही विद्यार्थी परीक्षेत बसत असला तरी त्याच्या विषयाची प्रश्‍नपत्रिका तयार करणे अपेक्षित असते. याउलट परीक्षा विभागाकडून असे कारण दिल्याने विद्यार्थिनीला धक्का बसला. याबद्दलचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित होताच परीक्षा विभागाला कुलगुरूंनी विचारणा केली. त्यावर केवळ एकच विद्यार्थिनी असल्याने प्रश्‍नपत्रिका तयार केले नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. विद्यार्थिनी अनुत्तीर्ण असल्याने ही बाब निदर्शनास आल्याचेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com