शाळेत फटाके फोडण्यास विरोध केल्याने मुख्याध्यापकास मारहाण

yavatmal
yavatmal

यवतमाळ : शाळेत फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या मुख्याध्यापकासह एका शिक्षकास विद्यार्थ्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ३) सकाळच्या सत्रात येथील फ्री मेथाडीस्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली.

या घटनेत मुख्याध्यापक रवींद्र सॅम्युअल मॅथ्यू (वय 60), शिक्षक विजय अरूण मॅकवान (वय 40) असे जखमींचे नाव आहे. 

दिवाळीनिमित्त सेलिब्रेशन म्हणून विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी आठला शाळेत फटाके फोडले. त्याला मुख्याध्यापकाने विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात दहावीच्या एका विद्यार्थ्यांने मुख्याध्यापकासह शिक्षकाला बेदम मारहाण केली. यामुळे शाळेत एकच खळबळ उडाली. मारहाण करताच विद्यार्थ्यांने शाळेतून पळ काढला.

जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर पालकांनी शाळेत धडक दिली. त्यामुळे काही प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून समाजाला चिंतन करण्याची गरम निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com