विद्यापीठ निवडणुकीबाबत विद्यार्थी गोंधळात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर : राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये यंदा खुल्या निवडणुका होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, तीन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्यापीठ-महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले. याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड न केल्यामुळे विद्यार्थी गोंधळात असल्याचे चित्र आहे.

विद्यार्थी नेतृत्वाला वाव मिळावा व विद्यापीठाच्या कारभारात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने यंदापासून राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये महाविद्यालयीन व विद्यापीठात खुल्या निवडणुका घेतल्या जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने काही महिन्यांपासून तयारी सुरू केली. तसेच निवडणुकीची जबाबदारी विद्यार्थी विकास विभागाकडे सोपविली.
निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका जाहीर करीत विद्यार्थी संघटनांसह प्राचार्यांचीही कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे निवडणुकीबाबत इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेगळी "लिंक' देण्यात आली. या "लिंक'वर निवडणूक संदर्भात माहिती असताना राज्य शासनाच्या निर्णयाची माहिती नसल्याने विद्यार्थीही बुचकाळ्यात पडले आहे. मात्र, तीन दिवसांपूर्वी राज्य शासनाने निवडणुका पुढे ढकलल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. त्यावर विद्यार्थी संघटनांनी शासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत वेळेतच निवडणुका घेण्याची मागणी केली. यानंतर काही घडामोडी घडल्यात का?, शासनाने निर्णय मागे घेतला का? अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे. याबाबत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. अभय मुदगल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही यास दुजोरा दिला असून, कुठलेही आदेश आले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, सोमवारी परिपत्रक काढण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students confused about university elections