विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नागपूर - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतिम वर्षाचा निकाल लागून सुमारे 20 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी ऑनलाइन प्रणालीवर अजूनही अनेक विद्यार्थ्यांचा निकाल दिसून येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रवेश खोळंबले आहेत. 

यशवंतराव चव्हान मुक्त विद्यापीठात शंभरच्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, मुक्‍त विद्यापीठाच्या सेंटरवर नियमित काही ना काही घोळ सुरूच असतो. कधी वेळेवर पुस्तक मिळत नाही, तर कधी निकाल वेळेवर लागत नसल्याचा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. विद्यापीठाचा असाच हलगर्जीपणा आणखी एका प्रकरणात दिसून आला. कला शाखेच्या अंतिम वर्षाच्या मोजक्‍याच विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाइन प्रणालीवर दिसत आहे. अलीकडेच एमपीएससीमार्फत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले असते. परंतु, निकालच न मिळाल्याने अर्ज करता आला नसल्याची खंत प्रदीप डेहारिया या विद्यार्थ्याने बोलून दाखविली. वेळीच निकाल मिळाला नाही, तर पुढील अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश रखडणार असून, वर्ष वाया जाण्याची भीती विशाल सासनकर, दिनेश मेश्राम यांनी बोलून दाखविली.

Web Title: Students in the dark future