कौतुकास्पद! विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केला शाळेचा बगीचा; आश्रमशाळेचा स्तुत्य उपक्रम

{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1614342323954,"A":[{"A?":"I","A":79.69636374886852,"B":544.1327526948448,"D":158.34150385518657,"C":48.65402573004823,"a":{"B":{"A":{"A":"MAEWkbeQURQ","B":1},"B
{"A?":"B","a":5,"d":"B","h":"www.canva.com","c":"DAERspJsD6g","i":"ZrGdgpLMmQdrSXyw0lSx8Q","b":1614342323954,"A":[{"A?":"I","A":79.69636374886852,"B":544.1327526948448,"D":158.34150385518657,"C":48.65402573004823,"a":{"B":{"A":{"A":"MAEWkbeQURQ","B":1},"B

गडचिरोली : सध्याच्या "वापरा आणि फेका' संस्कृतीच्या काळात अनेक टाकाऊ वस्तूंचा कचरा वाढत आहे. त्यासोबतच प्रदुषणासारख्या समस्याही वाढत आहेत. यावर एक उत्तम उपाय येथील दंडकारण्य शिक्षण संस्था गडचिरोलीद्वारे संचालित चांदाळा येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी शोधला आहे. येथील विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनात टाकाऊ वस्तूंपासून शाळेचा बगीचा व अनेक उपयोगी वस्तू तयार केल्या आहेत.

तथाकथित विकासाचा रथ दौडत असताना अनावश्‍यक वस्तूंची खरेदी, मोजका वापर व नंतर त्यांना केराची टोपली दाखविण्याची प्रवृत्तीही वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा वाढत आहे. त्यातही प्लॅस्टिकचा प्रदूषण निर्मितीस कारणीभूत ठरणारा कचरा अधिकच वाढत आहे. त्यामुळे या कचऱ्याला नष्ट करण्याऐवजी त्यालाच आकर्षक रूप देऊन विविध प्रकारे उपयोग आणावे, अशी कल्पना येथील शिक्षक सतीश पवार यांना सुचली. त्यांनी विद्यार्थ्यांना ही संकल्पना सांगताच विद्यार्थ्यांनाही कल्पना प्रचंड आवडली. 

त्यामुळे शिक्षक पवार यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात हा अनोखा उपक्रम प्रारंभ झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक टाकाऊ वस्तू वापरून त्यापासून शाळेचे आकर्षक प्रवेशद्वार तयार केले. याशिवाय बागेत विविध उपयोगी वस्तू तयार केल्या. त्यामुळे कचऱ्याची समस्या सुटण्यासोबतच शाळेची बागही सुंदर झाली आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

टाकाऊ वस्तू कुठेही इतरत्र फेकल्या जात असल्यामुळे दुर्गंधीचे वातावरण निर्माण होत असते. शिवाय या वस्तू निरुपयोगी होत असतात. मात्र गडचिरोली शहरापासून जवळच असलेल्या चांदाळा येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेचे शिक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनात टाकाऊ वस्तूंपासून टिकावू वस्तू तयार करून टाकाऊ वस्तूंचा सदुपयोग करण्याचा समाजाला एक चांगला संदेश दिला आहे. 

या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षक सतीश पवार यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. या उपक्रमाबद्दल दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, शाळेच्या मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी आदींनी शिक्षक पवार व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

इतरांनीही घ्यावी प्रेरणा...

सध्याचा कचऱ्याचा व पर्यायाने प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सर्वांनाच सामना करावा लागत आहे. त्यामुळे टाकाऊ वस्तूंचा कचरा वाढविण्याऐवजी त्याचा पुनर्वापर केल्यास अनेक समस्या सुटू शकतात. म्हणून चांदाळा येथील अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम इतरही शाळांमध्ये राबविणे गरजेचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com