प्रधानमंत्री कौशल केंद्राची विद्यार्थ्यांनी केली तोडफोड

Students have broken the Pradhan Mantri Kaushal Kendra
Students have broken the Pradhan Mantri Kaushal Kendra

अकोला : अकोल्यातील जूना आरटीओ रोडवरील गिरी नगर येथील प्रधानमंत्री
कौशल केंद्रात विद्यार्थ्यांनी आक्रमक होत तोडफोड केली. 

केंद्रातील काचा, दरवाजे, खुर्च्यांसह इतर साहित्यांची तोडफोड केल्याने मोठे
नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या या
प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस त्या तोडफोड
करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तोडफोड
करणाऱ्यांमध्ये आठ ते नऊ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत
आहे. मात्र, तोडफोडीचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com