विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रासाठी धावाधाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

नागपूर - वारंवार सूचना करूनही महाविद्यालयांकडून परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे विद्यापीठात सादर करण्यात दिरंगाई होते. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासाठी परीक्षा भवनाकडे धाव घ्यावी लागली. 

नागपूर - वारंवार सूचना करूनही महाविद्यालयांकडून परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे विद्यापीठात सादर करण्यात दिरंगाई होते. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासाठी परीक्षा भवनाकडे धाव घ्यावी लागली. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना सुरुवात झाली. चौथ्या टप्प्यातील परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. चौथ्या टप्प्याच्या परीक्षा सुरू झाल्या. 2 लाख 17 हजार विद्यार्थी 350 परीक्षा देत असून त्यापैकी 150 प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आहेत. या परीक्षा 29 नोव्हेंबरला सुरू होत असल्याने 28 ला प्रवेशपत्र मिळेल या आशेने विद्यार्थ्यांनी महाविद्यालय गाठले. मात्र, महाविद्यालयांनी परीक्षा भवनात जाण्याचा सल्ला दिला. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी लागेच परीक्षा भवन गाठले. मात्र, बराच वेळ प्रवेशपत्र न मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे परीक्षा भवन परिसरात दिवसभर गोंधळाचे वातावरण होते. महत्त्वाचे म्हणजे परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत 15-20 दिवसांपूर्वीच संपली. शनिवारपर्यंत विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले. मात्र, काही महाविद्यालयांनी परीक्षेसंदर्भातील कागदपत्रे वेळेत सादर केल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र तयार करण्यात उशीर झाला. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र वेळेवर द्यावे लागले. या प्रकाराने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी दोषी महाविद्यालयांवर कारवाईची मागणी केली. 

विद्यार्थ्यांची धावाधाव 
प्रवेशपत्र न मिळाल्याने गोंधळेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी दिवसभर धावाधाव करावी लागली. सकाळपासूनच सर्व्हर डाउन असल्याने प्रवेशपत्रासाठी बरीच वाट बघावी लागली. परीक्षा भवन व महाविद्यालयांसमोर विद्यार्थ्यांनी रांगा लावल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांना तात्पुरत्या प्रवेशपत्राचे वाटप करण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परीक्षा असूनही संपूर्ण दिवस अभ्यासाऐवजी परीक्षा भवनाच्या चकरा मारण्यात गेल्याने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. 

विद्यापीठाकडून जवळपास सर्वच महाविद्यालयांना शुक्रवारपर्यंत प्रवेशपत्र पाठविण्यात आले. परंतु, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले नाही अशांचे प्रवेशपत्र वेळेवर देण्यात आले. 
डॉ. नीरज खटी, परीक्षा नियंत्रक 

Web Title: Students pass stampede