श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

अकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा फॉरएव्हर’ यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला.

अकोला : जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘स्वच्छ मोर्णा’ मिशनची आठवण ठेवीत श्री समर्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांन्यांनी आपला गणेशोत्सव ‘बाप्पा फॉरएव्हर’ यंदा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला.

गणेशाेत्सवापुर्वी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी कर्याशाळा घेण्यात अाली. गणेशोत्सवादरम्यान बाप्पांच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी फुले आणणे, सजावट करणे या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून वाटून घेतल्या. शाळेचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, व संचालक मंडळाचा पाठिंबा विद्यार्थ्यांना होता. विद्यार्थ्यांनी वाजतगाजत बाप्पांची मिरवणूक काढली. शाळेतील लेझीम पथकाने मिरवणुकीत विशेष रंगत आणली. श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संचालक जयश्री बाठे, राजेश बाठे यांच्यासह इतर संचालक व मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बाप्पांची स्थापना करण्यात आली. रोज सकाळी विद्यार्थ्यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्याता अाली. उत्सवानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांच्या विविध क्रीडा स्पर्धाही घेण्यात आल्या.

या उत्सवादरम्यान खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी शाळेतील गणेशोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रीगणेशाला वाजतगाजत निरोप देण्यात आला. शाळेच्या आवारातच पर्यावरणाला हानी होणार नाही, अशा रीतीने गणेशाचे विसर्जन शाळेच्या आवारातच एका टाक्यात करण्यात आले. उत्सवादरम्यान जमा झालेले निर्माल्यही त्यातच टाकण्यात आले. आणि बाप्पांची स्थापना झाली त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

बाप्पा पोहोचले यू-ट्यूबवर
प्रा, नितीन बाठे यांच्या संकल्पनेतून अभिनव गणेशोत्सव या विषयावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. प्रदीप अवचार आणि सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनात एक लघुपटही बनविला आहे. ‘बाप्पा फॉरएव्हर’ या नावाने हा लघूपट यू-ट्यूबवर अाहे.

Web Title: students of samartha public school celebrates eco friendly ganesh festival in akola