प्रवेशदिंडी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

खामगाव : शासकीय शाळांच्या शैक्षणिक सत्र आज पासून सुरुवात होत असून आज शाळेचा पहिला दिवस आहे हा दिवस बुलडाणा जिल्ह्यात प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे.

खामगाव तालुक्यातील पहिली ISO नामांकित असलेल्या बोरिअडगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये गावामधून प्रवेश दिंडी काढण्यात आली ज्यामध्ये रथ सजवून विद्यार्थ्यांना फेटे बांधून बसविण्यात आले सोबत लेझीम ढोल तासे , तसेच बैल गाडी सजवून गावामधून ही प्रवेश दिंडी काढण्यात आली यावेळी.

जिल्हा परिषदेच्या शाळा हायटेक होत असून इंग्रजी शाळेच्या तुलनेत मराठी शाळा देखील कमी नसून विद्यार्थी व पालकांच्या मनात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळे विषयी आत्मीयता आणि विश्वास निर्माण व्हावा यासाठी शासन स्तरावरून ते स्थानिक स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी जी. डी. गायकवाड गट शिक्षणाधिकारी, उर्मिलाताई गायकी सभापती पं. स. खामगाव, एस. एल. पहाडे, केंद्रप्रमुख रामदास वाघमारे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , सी एम टिकार मुख्याध्यापक , कांशीराम वाघमारे ,शांताराम पांढरे ,संजीव नागरिक , शेख सर ,चोपडे सर यासह सर्व शिक्षण वृंद उपस्थित होते.

Web Title: students welcome on first day