यशोगाथा : हंगामी खरबूज शेती ‘लाखमोलाची’!

Success story of Farmer Anita Bhoyar From Vashim
Success story of Farmer Anita Bhoyar From Vashim

वाशीम : जिल्ह्यातील मानोरा हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जमिनीचा बहुतांश भाग हलक्या प्रतीचा आहे. मात्र, नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. जमीन हलकी असली तरी शेतकर्‍यांत कष्ट उपसण्याची जिद्द आहे. या अपार कष्टाद्वारे शेतकर्‍यांनी मातीतून मोती पिकविण्याची किमया साधली. ही बाब मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील महिला शेतकरी अनिता भोयर यांनी दाखवून दिली आहे. त्यांनी एक हेक्टर खरबूज शेतीतून 2 लाख 30 हजारांचे उत्पन्न घेतले आहे.

पारंपरिक पद्धतीने शेती न कसता, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांचे मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रयोगशील शेतीतही यश मिळू शकते. साखरडोह महिला शेतकरी अनिताताई राऊत यांनी राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास 2018-19 अंतर्गत टरबूज, खरबूज लागवड योजनेतून 1 हेक्टर क्षेत्रावर मल्चिंग पद्धतीने खरबूज लागवड केली. याकरिता त्यांना 25 हजार रुपये अनुदान मिळाले.

लागवडीपासून 75 दिवसांच्या कालावधीमध्ये खरबुजाची फळे काढणी योग्य झाली. गेल्या 20 दिवसांपासून या खरबूज फळांची काढणी करून बाजारपेठेत विक्री केल्या जात आहे. या एक हेक्टर खरबूज शेतीपासून त्यांना किमान 2 लाख 30 हजार 255 रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. अनिता भोयर यांना हंगामी खरबूज पिकापासून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांची खरबूज शेती सध्या परिसरातील शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 

यांच्या मार्गदर्शनात यशाची वाटचाल...
साखरडोह येथील प्रयोगशील महिला शेतकरी अनिताताई राऊत यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय चौधरी, तालुका कृषी अधिकारी समाधान पडघान, मंडळ कृषी अधिकारी किरण मुळे, कृषी पर्यवेक्षक डी. जी. देशमुख, कृषी सहाय्यक पी. एस. पागणीस, कृषी सहाय्यक डी. के. रणवीर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. 

पारंपरिक शेतीच्या तुलनेत राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियानांतर्गत खरबूज लागवड केली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पिकाची योग्य निगा राखली. त्यामुळे उत्पन्नाचा दर्जा चांगला आहे. परिणामी, बाजारात मागणी असून, दरही अपेक्षित मिळत आहे. - अनिताताई भोयर, खरबूज उत्पादक महिला शेतकरी, साखरडोह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com