आयसोलेशन रुग्णालयाला उपमहापौरांची अचानक भेट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

नागपूर - शहरवासींना महापालिकेकडून किमान प्राथमिक आरोग्य सुविधेची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. मात्र, सर्वच रुग्णालये दुरवस्थेत आहेत. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी मंगळवारी अचानक आयसोलेशन रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा डॉक्‍टरच उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब त्यांना दिसली.

महापालिकेच्या रुग्णालयांची दुरवस्था, रुग्णांना अपेक्षित सुविधा नाही, डॉक्‍टरांच्या पत्ता नाही,  अशा एक नव्हे अनेक मुद्द्यांकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी ‘सकाळ’ने १३ ते १६ मेपर्यंत स्टिंग ऑपरेशन करून ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत सामाजिक, राजकीय संघटनांनी महापालिकेला निवेदन देऊन रुग्णालयाच्या ढासळत्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. महापालिका रुग्णालयांची स्थिती सुधारून सामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असेही निवेदनात नमूद केले. तत्कालीन विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनीही आयुक्तांना पत्र लिहून रुग्णालयात नागरिकांना औषधी, डॉक्‍टर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी आरोग्य सभापती मनोज चाफलेसह अचानक  आयसोलेशन रुग्णालयाला भेट दिली. मात्र, निगरगट्ट डॉक्‍टर, कर्मचारी येथे उपलब्ध नसल्याचे आढळून आले. येथील अस्वच्छतेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, झोनल अधिकारी रवींद्र गायकवाड, उपअभियंता सिंग व इतर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत स्वच्छतेसोबतच तत्काळ डॉक्‍टर व कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश  दिले. रुग्णालयांच्या मोडकळीस आलेल्या भिंती दुरुस्त कराव्या, अशी सूचनाही केली.

Web Title: A sudden visit of Deputy Mayor to Isolation Hospital