मंत्री महोदय म्हणतात, हारे तुरे नको रुग्णसेवा करा!

minister shingne.jpg
minister shingne.jpg

देऊळगावराजा (जि.बुलडाणा) : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरला  (ता.24) अचानक भेट दिल्याने आरोग्य विभागात तारांबळ उडाली. पालकमंत्र्यांनी स्वतः हजेरी बुक तपासून उपस्थित डॉक्टरांना चांगलाच धारेवर धरले. 

दरम्यान, अनेक दिवसांपासून उपस्थिती रजिस्टरमध्ये हे स्वाक्षरी नसलेल्या आरोग्य अधीक्षकांसह तिघा डॉक्टरांच्या नावांसमोर दहा दिवसांची गैरहजेरी मांडल. या कारवाईने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत वेळोवेळी मारण्यात येणाऱ्या दांडीमुळे रुग्णसेवा कोलमडली गेली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता आज दुपारी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. 

डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ
पालकमंत्र्यांच्या या भेटीने उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली पालकमंत्री ग्रामीण रुग्णालयात आले म्हणून दांडी बहाद्दर कर्मचारी लगेच हजर झाले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाहून ते उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यावर चांगलेच संतापले. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः उपस्थिती रजिस्टर तपासले असता आरोग्य अधीक्षक यांच्यासह दोन आरोग्य अधिकाऱ्यांच्या नावांसमोर गेल्या 14 तारखे पासून उपस्थित असल्याबद्दल स्वाक्षरी नसल्याचे आढळून आले. याबाबत पालकमंत्र्यांनी विचारले असता महिन्याच्या शेवटी हजेरी बुकवर स्वाक्षरी करण्यात येते म्हणून संबंधित डॉक्टरांनी सांगितले.

या गैरहजर डॉक्टरांच्या नावासमोर मांडली गैरहजेरी
त्यावेळी पालकमंत्र्यांनी स्वतः 14 तारखेपासून आज पर्यंत आरोग्य अधीक्षक डॉ. असमा खान, आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष शिंगणे आणि डॉ.वैशाली माटे यांच्या नावांसमोर गैरहजेरी मांडली व स्वतःचा अभिप्राय लिहिला याप्रसंगी ट्रामा केअर सेंटरची पाहणी करून आवश्यक यंत्रसामग्री आणि रिक्त पदाबाबत तत्काळ अहवाल तयार करून माझ्याकडे सादर करा असे मौखिक आदेश डॉ.शिंगणे यांनी यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, तालुकाध्यक्ष राजू शिरसाठ, बाजार समिती सभापती महेश देशमुख, रंगनाथ कोल्हे, नगरसेवक विष्णू रामाने, हनिफ शहा, नवनाथ गोमधरे, इस्माईल बागवान, अतिश कासारे, अरविंद खांडेभराड आदींची उपस्थिती होती.

मी पुन्हा अचानक भेट देईल
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे मंत्री झाल्या नंतर ग्रामीण रुग्णालयात प्रथमच भेट असल्याने घाईगडबडीत आरोग्य विभागामार्फत सत्कार करण्यासाठी आरोग्य अधिकारी पुढे आले. त्यावेळी हारतुरे आता बस झाले उपचारासाठी आलेल्या रुग्णांची चांगल्या प्रकारे सेवा करा मी पुन्हा अचानक भेट देईल असे म्हणून त्यांनी हारतुरे स्वीकारले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com