
भाजप नेते दबावाखाली तक्रारकर्ता प्रभावित होऊ नये यासाठी राजीनामा मागत होते आणि आमची भीती खरी ठरली, असेही मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विविध संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र यामध्ये भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी उडी घेत या प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलं होतं. मात्र आता आरोप करणाऱ्या महिलेनं आपले आरोप मागे घेतले आहेत. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्याने आता मुंडेंवर निशाणा साधणारे पेचात पडले आहेत. यासंदर्भात भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तक्रारकर्त्यावर दबाव येऊ नये यासाठी राजीनामा आवश्यक असतो, सेटिंग-फिटिंग हा गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न झाला का? आता त्या महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते मुनगंटीवार यांनी केली आहे.
हेही वाचा - कोणाच्या गळ्यात पडणार सरपंच पदाची माळ? दोन फेब्रुवारीला आरक्षण सोडत
भाजप नेते दबावाखाली तक्रारकर्ता प्रभावित होऊ नये यासाठी राजीनामा मागत होते आणि आमची भीती खरी ठरली, असेही मुनगंटीवार म्हणाले.
नेमकं काय आहे प्रकरण?
स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा खुलास केला होता. धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचं देखील सांगितलं. पहिल्या पत्नीपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं होतं.
दरम्यान रेणू शर्माने धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करत ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
नक्की वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल...
पीडितेच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती, तर धनंजय मुंडेंविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ