दहा महिन्यांत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करणार : मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

जिवती (जि. चंद्रपूर) : "कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य आणि पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहेत. पुढील महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील', अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यांच्या हस्ते काल (शुक्रवार) सायंकाळी कोरपना पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण झाले. 

जिवती (जि. चंद्रपूर) : "कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य आणि पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहेत. पुढील महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील', अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यांच्या हस्ते काल (शुक्रवार) सायंकाळी कोरपना पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण झाले. 

यावेळी फर्निचर आणि अन्य बाबींसाठी 1.40 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही मुनगंटीवार यांनी केली. या उद्‌घाटन सोहळ्याला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राजुरा मतदारसंघाचे आमदार संजय धोटे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, महिला व बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे, कोरपना पंचायत समिती सभापती शाम रणदिवे उपस्थित होते. 

तीन हेक्‍टर क्षेत्रात जुन्या पंचायत समितीच्या आवारात हे नवीन पंचायत समिती संकुल उभारण्यात आले. यासाठी दोन कोटी 41 लाख रुपयांमध्ये हे कार्यालय उभारण्यात आले आहे. 'जिल्ह्यात जिवती, कोरपना, पोभुर्णा, नागभीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून समतोल विकासाचा आपला संकल्प आहे', असे मुनगंटीवार यांनी सांगितले. जिवती, कोरपना भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा आणि कोरपना, गडचांदूर येथील बसस्थानकाची कामे पुढील महिन्यात पूर्ण झाली असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासोबतच सरपंच मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका स्मार्ट ग्राम म्हणून 2016-17 चा प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत कुकडसाथला देण्यात आला. सरपंच वंदना चवले, ग्रामसेवक भुजंगराव सूर्यवंशी यांनी पुरस्कार स्वीकारला. 2017-18 चा सरपंच पुरस्कार मंगलदास गेडाम, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुळकर यांना देण्यात आला. 

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नितीन नरड यांना देण्यात आला; तर वडगावचे सरपंच मोहपत मडावी यांचाही सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास सभापती शामजी रणदिवे, उपसभापती संभाशिवजी कोवे, गटविकास अधिकारी डॉ. संदीप धोन्सीकर, धनंजय साळवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांनी केला. मनोगत सभापती शामजी रणदिवे, उपसभापती संभाशिवजी कोवे यांनी केले .कोरपना तालुक्‍याला विविध योजनेतून अधिक प्रतिनिधीत्व देण्याची मागणी केली.

Web Title: Sudhir Mungantiwar promises completion of infrastructure work within 10 months