...तर उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती : मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar

चंद्रपूर : वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्याला ते उत्तर देत होते. उद्धवजी युती सरकारचे महत्वाचे नेते आहेत. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सुप्रीम कोर्टाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केलीच आहे.

विनाकारण यात हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com