माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉझिटीव्ह; संपर्कातील लोकांनी चाचणी करुन घेण्याचे आवाहन 

विनोद राऊत 
Saturday, 19 September 2020

यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांचे मुंबईतील काही कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांनी दोन दिवसीय विधीमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहणे टाळले होते. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आ. सुधीर मुनगंटीवार  मदतकार्यात व्यस्त आहेत. 

चंद्रपूर : माजी अर्थमंत्री, भाजप नेते, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या चाचणी नंतर डॉक्टरांच्या सल्यानूसार त्यांनी  स्वतःला चंद्रपूर इथल्या घरी  होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. 

जे लोक आपल्या संपर्कात आले त्या सर्वानी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटवरुन केले आहे. माझी तब्येत ठणठणीत असून, काळजी करु नये. मात्र संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी अस आवाहन त्यांनी केले आहे. 

यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांचे मुंबईतील काही कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने त्यांनी दोन दिवसीय विधीमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहणे टाळले होते. लॉकडाऊन लागू झाल्यापासून आ. सुधीर मुनगंटीवार  मदतकार्यात व्यस्त आहेत. 

 

 

चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागाला पुराचा फटका बसल्याने त्यांनी या भागात सातत्याने दौरै केले. लॉकडाऊनच्या काळातही  सुधीर मुगंटीवार यांनी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित करुन राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.

दरम्यान गेल्या महिनाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसभरात सरासरी 300 ते 400 कोरोना रुग्ण निघत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhir mungantiwar tested corona positive