कॉंग्रेसची "एक्‍स्प्रायरी डेट' संपली - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावरून कॉंग्रेस पक्षाची उपयोगिता संपल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेसमधील चांगल्या व सेवाभाव जोपसणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचा सदुपयोग केला जाईल, असा टोला राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला. 

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप!

नागपूर - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावरून कॉंग्रेस पक्षाची उपयोगिता संपल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेसमधील चांगल्या व सेवाभाव जोपसणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचा सदुपयोग केला जाईल, असा टोला राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला. 

33 कोटी वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी ते आज नागपूरला आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवर म्हणाले, लोकभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे सारेच बडे नेते पराभूत झाले आहेत. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना खानदानी अमेठी मतदारसंघात पराभवाला समोर जावे लागत आहे. लोकसभेतील गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनाही आपला मतदारसंघ राखता आला नाही. त्यामुळे कोणाला अध्यक्ष करावे, असा पेच कॉंग्रेसला पडला आहे. असे असले तरी कॉंग्रेसमधील चांगले व सेवाभाव जोपासणारे नेते व कार्यकर्त्यांचे भाजपत आणून पुनर्वसन केले जाईल. मात्र, चुकीच्या पक्षात राहणाऱ्या व चुकीचे काम करणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. 

सदस्य नोंदणी पुस्तिका फाडावी लागेल 
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याविषयी केलेल्या मागणीवर प्रश्‍न विचारला असता, मुनगंटीवार यांनी कॉंग्रेसला आता सदस्य नोंदणी पुस्तिका फाडून टाकावी लागणार असल्याचा टोला मारला. कॉंग्रेसच्या सदस्य नोंदणी पुस्तिकेत पहिली अट मी दारू पिणार नाही, अशी आहे. मात्र, खासदारच दारूबंदी हटविण्याची मागणी करीत असेल, तर कॉंग्रेसला आता आपल्याच नियमात बदल करावा लागेल, असेही ते म्हणाले. 

युतीचेही वाघ वाढणार 
महाराष्ट्राच्या जंगलात वाघ वाढले आहेत. आता राज्याच्या विधानसभेतही भाजप-शिवसेना युतीच्या वाघांची संख्या वाढणार, असल्याचा दावा, मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. 

ताज्या आणि अचूक बातम्या वाचण्यासाठी डाऊनलोड करा 'सकाळ' चे मोबाईल अॅप!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudhir Mungantiwar told reporters clear that the Congress party utility ended in the defeat of Lok Sabha elections