निलंबनासह वेतनवाढ रोखणार साखरेचे दर नीचांकीवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नागपूर - साखरेचे दर गेल्या चार वर्षात प्रथमच प्रतिक्विंटल २९ हजारावर आले आहे. सोमवारी यावर्षीचा सर्वाधिक नीचांकी दर ठोक बाजारात नोंदविण्यात आला. यामुळे ठोक विक्रेत्यांनी थांबा आणि पाहा अशी भूमिका घेतली आहे. आता पाकिस्तानकडून ६० लाख  क्विंटल साखर भारतात आल्याने पुन्हा भाव कमी होतील अशी भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

यंदा देशात उसाचे उत्पादन चांगले असल्याने २५१ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. देशात साखरेची मागणी २५० लाख टन आहे. गेल्यावर्षी मागणीपेक्षा साखरेचे उत्पादन २०३ लाख टन म्हणजे २० टक्‍क्‍यांनी घटले होते. परिणामी साखरेचे दर ठोक बाजारात चार  हजार रुपये क्विंटलवर पोचले होते. किरकोळ बाजारात ४ हजार ५०० रुपये दराने विक्री केली जात होती. त्यामुळे ग्राहकांचा खिसा चांगलाच हलका झाला होता. त्यावेळी सरकारने साखरेच्या भावावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केले. त्याला किंचित यश आले होते. 

आता मात्र, वाढलेले उत्पादन आणि पाकिस्तानमधून आलेल्या साखरेचे परिणाम बाजारावर जाणवू लागले आहेत. यंदा साखरेचा शिल्लक साठा आणि यंदा उत्पादन वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता साखरेचे भाव ऑक्‍टोबरपासूनच घसरू लागले होते. त्यामुळे ३ हजार ७०० रुपयावरून साखरेचे भाव प्रतिक्विंटल २९ हजारावर आले आहे. २०१४ साली साखरेचे असलेले भाव यंदा झाले असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी ऊस उत्पादक अडचणीत येण्याची शक्‍यता बळावली आहे. 

सध्या २९०० रुपये प्रतिक्विंटल साखरेचे दर आहे. त्यात अजून घट अपेक्षित नाही. भाव कमी झाल्यास शेतकरी अडचणीत येतील. 
-राजेंद्र गुप्ता, साखरेचे व्यापारी 

Web Title: Sugar prices down

टॅग्स