साखरेचे भाव घटले, तरी किरकोळ बाजारात तेजीच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नागपूर - यंदा महाराष्ट्रासह देशातही साखरेचे उत्पादन वाढले. त्यामुळे केंद्राने साखरेच्या आयातीवर निर्बंध आणले आहेत. विदर्भात साखरेचे भाव गेल्या दोन महिन्यांत प्रतिक्विंटल चार हजारांहून 3200 रुपयांपर्यंत घटले आहेत. घाऊक बाजारात साखरेचे भाव किलोमागे आठ रुपयांनी उतरले. तरी किरकोळ बाजारात अद्याप सारखरेची विक्री 40 रुपये प्रति किलोप्रमाणे होत आहे. 

2017-18 या वर्षात साखरेचे उत्तर प्रदेशात 28.20 लाख टन, महाराष्ट्रात 31.30, कर्नाटकमध्ये 13.50, गुजरातमध्ये 2.95 आणि इतर राज्यांत 6.25 असे 83.15 लाख टन एवढे उत्पादन झाले. यंदा झालेल्या साखरेच्या उत्पादनाएवढी गरज देशाला आहे. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे पाकिस्तानने स्वत:ची साखर निर्यात करण्याचे ठरविले. पाकिस्तानची साखर भारतात आल्यास देशांतर्गत साखरेवर त्याचा परिणाम होईल. प्रतिक्विंटल भाव घटल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारात होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. ऐंशी टक्के साखर शीतपेय, आइस्क्रीम बनविण्यासाठी वापरली जाते. उर्वरित वीस टक्के साखर खाण्यासाठी वापरली जाते. सध्या साखर प्रतिकिलो 38 ते 40 रुपये भावाने विकली जाते. दर घटल्याचा प्रत्यक्षात ग्राहकांना कितपत फायदा मिळेल, याबाबत अद्याप साशंकता आहे. 

महाराष्ट्राला ईशान्येकडील राज्यांची बाजारपेठ मिळत होती. यंदा उत्तर प्रदेशात साखरेचे चांगले उत्पादन झाल्याने तेथील उत्पादकही बाजारपेठेच्या शोधात आहेत. त्या राज्याला ईशान्येकडील बाजारपेठ जवळ आहे आणि किमतीवरून उत्तर प्रदेशबरोबर स्पर्धा करणे महाराष्ट्राला अवघड असल्याने साखरेचे दर घटले आहेत. भाव स्थिर ठेवण्यासाठी 20 लाख टनांचा साठा (बफर स्टॉक) करावा, अशी मागणी केंद्राकडे केलेली आहे. गेल्या चार वर्षांनंतर प्रथमच साखरेच्या भावात मोठी घसरण झाल्याचे साखर व्यापारी अनिल अग्रवाल यांनी सांगितले. 

साखरेचे भाव 
ठोक - 32 रुपये प्रतिकिलो 
किरकोळ - 40 रुपये प्रतिकिलो 

Web Title: Sugar prices have risen in the retail market