प्रेमविवाहानंतर एकाच महिन्यात आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

लग्नाच्या एकाच महिन्यानंतर अमोल ईश्‍वर सोनेकर या (वय 34) तरुणाने आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

नागपूर -  घरच्यांशी नाते तोडून प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या प्रेमीयुगुलांनी संसार थाटला. मात्र, या संसाराला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक. लग्नाच्या एकाच महिन्यानंतर अमोल ईश्‍वर सोनेकर या (वय 34) तरुणाने आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, त्याने नेमक्‍या कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकले नाही. 

Web Title: Suicide after one month Love marriage