पत्नीसह दीड वर्षाच्या मुलीला विष पाजून घेतली फाशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

अार्वी येथे अनिल वानखेडे यांनी वडिलांशी झालेल्या भांडणातून मंगळवारी सायंकाळी 7 वाजता घराबाहेर पडत आत्महत्या केली. विषारी औषध विकत घेतल्यानंतर ते अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात प्राशन केले. त्यानंतर झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केली.

आष्टी (जि. वर्धा) : लहान आर्वी येथील अनिल नारायण वानखडे (वय 37), पत्नी स्वाती अनिल वानखडे, मुलगी आस्था (वय दीड) या तिघांनी वडिलांशी झालेल्या वादातून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अार्वी येथे अनिल वानखेडे यांनी वडिलांशी झालेल्या भांडणातून मंगळवारी सायंकाळी 7 वाजता घराबाहेर पडत आत्महत्या केली. विषारी औषध विकत घेतल्यानंतर ते अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात प्राशन केले. त्यानंतर झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केली.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पंचनामा सुरु आहे

Web Title: suicide in Amravati

टॅग्स