एसआरपीएफ जवानाचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

अमरावती : राज्य राखीव पोलीस दलाच्या अमरावती शहरातील गट क्रमांक ९ मधील एका पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. मंगेश वरठे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिपायाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत, परिस्थिती गंभीर असल्या कारणाने त्याला पुढील उपचारांकरिता नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश हा राज्य राखीव दलात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असून तो आज नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेट क्रमांक वर तैनात असतांना त्याने आपल्या स्वतःच्या बंदुकीने आपल्या उजव्या खांद्यावर गोळी झाडली. त्यानंतर बराच वेळ मंगेश हा त्याच ठिकाणी पडून होता.

शहर पोलिसांची व्हॅन परिसरात गस्त घालीत असतांना त्यांना मंगेश रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडलेला आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला लगेच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र मंगेशच्या शरीरातून होत असलेला रक्तस्त्राव थांबत नसल्याने त्याला नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.  मंगेशने आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपस करीत आहेत.

Web Title: suicide attempt by srpf jawan on shoot self