esakal | मुकुटबन येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुकुटबन येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

झरी जामणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील मुकुटबन येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी (ता. 24) घडली. मल्लेसू बुच्चन्ना कुंटावार (वय 60) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर शनिवारी दुपारी दोनदरम्यान मुकुटबन येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मल्लेसू कुंटावार यांनी शुक्रवारी (ता. 23) संध्याकाळच्या सुमारास विष घेतले. ही बाब सर्वप्रथम त्यांच्या मुलांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने मुकुटबन येथील रुग्णालयात नेले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी दीपक पंडित यांनी पोलिसांना माहिती दिली. प्रथमोपचार केल्यावर त्यांना वणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तेथेही त्यांनी उपचाराला दाद न दिल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सततच्या नापिकी व कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कर्ज असून खासगी कर्जसुद्धा आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व चार मुली आहेत.

loading image
go to top