बँकेचे कर्ज व नापिकीने घेतला शेतकऱ्याचा जीव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

गोरेगाव : तालुक्यातील गौरीटोला (तिल्ली मोहगाव) येथील तरुण शेतकरी तिलकचंद चौरागडे (वय 30) वर्षे यांनी बँकेचे कर्ज, सततची नापाकीमुळे आज सकाळी शेतातील झाडाला दोरफंदा लावुन आत्महत्या केली आहे. 

गोरेगाव : तालुक्यातील गौरीटोला (तिल्ली मोहगाव) येथील तरुण शेतकरी तिलकचंद चौरागडे (वय 30) वर्षे यांनी बँकेचे कर्ज, सततची नापाकीमुळे आज सकाळी शेतातील झाडाला दोरफंदा लावुन आत्महत्या केली आहे. 

त्यांचे दोघे भाऊ, आई, वहिनी, पुतणी असे कुटुंब होते. मोठा भाऊ मृत्यु पावल्याने सर्व जबाबदारी तिलकचंद चौरागडे यांच्यावर आली. शेती ही पाच एकर असल्याने त्यांनी सेवा सहकारी संस्थेतुन 46 हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. ही शेतजमिन कोरडवाहु असल्याने सतत नापिकी पदरी पडली. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येत नव्हता. तसेच शासनांनी कर्ज माफी केल्याची घोषणा केली पण त्याला कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने नवीन कर्ज सुद्धा घेता येत नव्हते.

शेतीला लागणारे बियाणे, पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न तिलकचंद चौरागडे समोर असल्याने त्यांनी पत्नी, आई यांना न सांगता आज सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

या घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस चमु गौरीटोला येथे दाखल झाली पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी गोरेगाव येथे आणण्यात आले या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अमलदार प्रदीप गणविर व सहकारी करीत आहेत.

Web Title: suicide of farmer because of loan and unproductive land