पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने लावला गळफास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

अहेरी (जि. गडचिरोली) - कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. ४) सकाळी आलापल्ली येथील बिलिव्हर्स चर्चमध्ये उघडकीस आली. मोनिका संजय भोगेवार (वय ३०) व संजय समय्या भोगेवार (वय २५), रा. आलापल्ली, अशी मृत पत्नी व पतीची नावे आहेत.

आलापल्ली येथील संजय भोगेवार हा पत्नी मोनिका व दीड वर्षीय मुलासह वास्तव्य करीत होता. त्यांनी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला होता. पत्नीची प्रकृती बरी नसल्याने शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेआठच्या सुमारास दोघेही गोंड मोहल्ल्यातील बिलिव्हर्स चर्चमध्ये आले. तेथे प्रार्थना केल्यानंतर फादर दुसऱ्या खोलीत झोपायला गेले; तर संजय व मोनिका एकाच खोलीत थांबले होते. शनिवारी सकाळी काही मंडळी चर्चमध्ये गेली असता त्यांना दोघेही मृतावस्थेत आढळून आले. माहिती मिळाल्यानंतर अहेरी पोलिस घटनास्थळी रवाना झाले. कौटुंबिक कलहातून रात्री दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात संजयने पत्नी मोनिका हिच्या डोक्‍यावर दांड्याने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर भीतीमुळे संजयने चर्चमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सततच्या वादामुळे संजयची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती, अशी माहिती मिळाली आहे. प्रकरणाचा तपास अहेरीचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर करीत आहेत.

Web Title: Suicide by husband hanging after wife's murder after family dispute