विषप्राशन करुनही मरण न आल्याने गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

नागपूर : पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. रूही शोएब अहमद उर्फ रितू सिंग (40,सोनेगाव हद्दीत ममता सोसायटी) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नागपूर : पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. रूही शोएब अहमद उर्फ रितू सिंग (40,सोनेगाव हद्दीत ममता सोसायटी) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

शोएब हा पत्नीपासून विभक्‍त राहत होता तर रितू सिंग हिचेही पतीसोबत पटत नव्हते. त्यामुळे ते दोघेही आपापल्या जोडीदारापासून विभक्‍त राहत होते. शोएब आणि रितूची भेट झाली. दोघेही इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करीत होते. दोघेही एकाच व्यवसायात असल्याने दीड वर्षापूर्वी त्यांनी लग्न केले. सात दिवसांपूर्वी शोएबच्या फेसबुकवर एका अनोळखी महिलेचे छायाचित्र दिसून आले. शोएबचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय रितूला होता. त्यामुळे मागील सात दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. याच वादातून मंगळवारी दुपारी रितूने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यातून काहीच फरक न जाणवल्याने तिने सिलिंग पंख्याला कापड बांधून गळफास लावला. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्यांच्याकडे कामाला असलेला नोकर शुभम राधेश्‍याम माहुले (20) टेलिकॉमनगर हा रितूच्या घरी आला असता आतून दार बंद होते.

शुभमने बराच आवाज दिला परंतु, आतून दार उघडले गेले नाही. त्यामुळे त्याला संशय आला. ही माहिती त्याने शोएबला दिली. शोएबने घरी येऊन दाराचा कडीकोंडा तोडला असता रितू गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. तसेच जवळच उंदीर मारण्याच्या विषाच्या पुड्‌या पडल्या होत्या. ही माहिती सोनेगाव पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Suicide of Married Women Due to Doubt on Husband Character