विष पिऊन पित्याची मुलीसह आत्महत्या

File photo
File photo

गोंदिया : रेल्वे चौकीलगतच्या श्रीनगर येथील एका व्यक्तीने आपल्या चिमुकल्या मुलीला विष पाजून स्वतःही आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना आज, मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. योगेश देवराव वंजारी (वय 32) व खुशी योगेश वंजारी (वय 4) अशी मृतांची नावे आहेत.
पत्नीच्या आत्महत्येचे न्यायालयीन प्रकरण आणि मुलीच्या संगोपनाचा प्रश्‍न अशा द्विधा मनःस्थितीत योगेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. एक ते दीड वर्षापूर्वी योगेशच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येला योगेश जबाबदार असल्याचा आरोप करीत सासरच्यांनी त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. त्यामुळे योगेशला 3 महिने तुरुंगात राहावे लागले. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. घरी परतल्यानंतर योगेशने सायकल दुरुस्ती आणि सायकलचे सुटे भाग विकण्याचे दुकान सुरू केले होते. एकीकडे पत्नीच्या आत्महत्येचे न्यायालयीन प्रकरण तर, दुसरीकडे मुलीचे संगोपन यामुळे तो व्यथित झाला होता. योगेश सोमवारी (ता.19) रात्री खुशीसोबत जेवण करून झोपला. सकाळी 8 वाजेपर्यंत झोपून उठला नसल्याने आईवडिलांनी त्याच्या खोलीत जाऊन पाहिले. तेव्हा दोघांच्याही तोंडातून फेस आल्याचे आणि ते निपचित पडल्याचे दिसले. डॉक्‍टरने त्यांना मृत घोषित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com