सुसाईड नोट लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या

सुसाईड नोट लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या

नागपूर : "मी जगण्याच्या योग्यतेची नाही, मम्मी पप्पा मला माफ करा', अशा आशयाची चिठ्ठी लिहून इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. देवश्री वानखेडे (17) रा. गावंडे ले-आउट, खामला असे मृताचे नाव आहे. ती विज्ञान शाखेत इयत्ता बारावीची विद्यार्थिनी होती. गुरुवारी रात्री कुटुंबीयांनी सोबत जेवण घेतले. यानंतर रात्री 11.30 वाजता देवश्री अभ्यासासाठी आपल्या खोलीत निघून गेली. दरम्यान, तिने सिलिंग फॅनला चादरीने बांधून गळफास लावून घेतला. शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास आई ज्योत्स्ना खोलीजवळून गेली असता तिला देवश्री गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. त्यांची किंचाळी ऐकून घरातील अन्य सदस्य व शेजारी धावून आले. माहिती मिळताच प्रतापनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. देवश्रीचे वडील खासगी काम करीत असून कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले होते. ते परतण्यापूर्वीच मुलीच्या आत्महत्येचे वृत्त त्यांच्यापर्यंत पोचले. दरम्यान, पोलिसांना देवश्रीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. आत्महत्येचे नेमके कारण नमूद नसले तरी ती नैराश्‍यात असावी किंवा कोणत्यातरी कारणावरून अपराधीपणाची भावना तिच्या मनात असावी त्यातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा कयास लावला जात आहे. आईच्या सूचनेवरून प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com