शेतकऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

तालुक्यातील धाडी येथील संतोष नारायण बाठे वय 48 वर्ष या शेतकऱ्याने आपल्या शेतीवर असलेल्या कर्जाला कंटाळून सततच्या नापीकीमुळे  सोमवारी (ता.2) रोजी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
 

नांदुरा - तालुक्यातील धाडी येथील संतोष नारायण बाठे वय 48 वर्ष या शेतकऱ्याने आपल्या शेतीवर असलेल्या कर्जाला कंटाळून सततच्या नापीकीमुळे  सोमवारी (ता.2) रोजी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

धाडी येथील शेतकरी संतोष नारायण बाठे यांचे धाडी शिवारात गट क्र.97 व 106 मध्ये 2.04 हेक्टर जमीन असून सदर शेतीवर ग्रामसेवा सहकारी संस्थेचे  त्यांच्यावर कर्ज असल्याचे तलाठी यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले असून, सदर शेतकऱ्याने सततच्या नापीकीमुळे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजते.

Web Title: Suicide by plowing a farmer under a train

टॅग्स