दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

file photo
file photo

अमरावती,  ः शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शुक्रवारी (ता. 14) रात्री दोघांनी स्वत:च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्या.
शनिवारी (ता. 15) सकाळी साडेअकराच्या सुमारास वॉलकट कंपाउंड परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.
भोजराज चंपतराव वाढवे (वय 57 रा. जेवडनगर) व सूरज बबन मेश्राम (वय 50 रा. संजयगाधीनगर 2) असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. श्री
वाडवे हे काही दिवसांपासून कॅन्सरने आजारी होते. त्यांनी घरातच आजाराला कंटाळून आत्महत्या केली, असे राजापेठ पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. श्री. मेश्राम यांनीही शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. श्री. मेश्राम यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. फ्रेजरपुरा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.
शनिवारी (ता. 15) सकाळी साडेअकराच्या सुमारास वॉलकट कंपाउंड परिसरात अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. शहर कोतवाली पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेतला असता, पंकज अशोक ढोके (वय 33 रा. पंचशीलनगर) असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. उष्माघाताने श्री.ढोके यांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com