भीसी चालविणाऱ्या महिलेची आत्महत्या

File photo
File photo

अमरावती : शहरातील कबीरनगरात भीसी चालविणाऱ्या एका महिलेच्या मागे इतर लोकांनी पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे तिने शनिवारी (ता. 14) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
शबाना परवीन (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास या महिलेने घरीच विषारी औषध प्राशन केले. तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सायंकाळी चारच्या सुमारास शबाना परवीन हिचा मृत्यू झाला. सदर महिला ही परिसरातील लोकांकडून भीसीचे पैसे गोळा करीत होती. एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी मागील महिन्यात भिसीचा क्रमांक आल्यामुळे हजारो रुपयांची रक्कम घेतली. परंतु त्यानंतर भिसीचा हप्ताच भरला नाही. सप्टेंबर महिन्यात एका महिलेला भीसीचे पैसे देण्याची वेळ आली. परंतु अनेक लोकांनी पैसेच भरले नाही. त्यामुळे शबाना परवीन हिच्या मागे ज्यांनी भिसीचे नियमित हप्ते भरले अशा काहींनी पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे तिने आज (ता. 14) सकाळी स्वत:च्या घरातच विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नागपुरीगेट पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. मृत्यूपूर्वी सदर महिलेने स्वत:च्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली.
महिलेने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. त्यामध्ये काही लोकांकडून तिला पैसे घेणे बाकी होते. असा उल्लेख आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल केला नाही. तपासानंतर योग्य ती कारवाई केल्या जाईल.
- अर्जुन ठोसरे,
पोलिस निरीक्षक नागपुरीगेट ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com