छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

नागपूर-अनैतिक संबंधाला विरोध केल्यामुळे संतापलेल्या पतीकडून शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शारदा भगवान ढोमने (35) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.

या प्रकरणी कळमना पोलिसांनी भगवान तुळशीराम ढोमणे (45) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास भरतवाडा वस्तीत घडली. भगवानचे विधवा महिलेशी प्रेमसंबंध होते. त्या महिलेला दोन मुली आहेत. याबाबत शारदा यांना माहीत झाले. शारदा यांनी भगवानला समजविण्याचा प्रयत्न केला

याच कारणावरून दोघांचे दररोज भांडण व्हायचे. संतापलेला भगवान नेहमी शारदाला मारहाण करायचा. सततच्या जाचाला कंटाळून शारदाने विष प्राशन करून आत्महत्या केली. भगवानच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शारदाने आत्महत्या केल्याचे तपासानंतर उघड झाले. 

Web Title: suicide by women

टॅग्स