तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

गौळ (जि. वर्धा) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून देवळी तालुक्‍यातील कोळोणा (चोरे) येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. 17) उघडकीस आली. उल्हास दयाल वाघमारे (वय 47), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

उल्हास वाघमारे यांच्याकडे साडेआठ एकर शेती आहे. या शेतजमिनीवर सेवा सहकारी सोसायटीचे 72 हजारांचे कर्ज होते. सोबतच खासगी 50 हजारांचे कर्ज आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेत कर्जमाफी होईल, अशी त्यांना आशा होती. मात्र, अद्यापही कर्जमाफ झाले नव्हते. यंदा अतिवृष्टीमुळे पिकांवर विविध रोगांनी प्रादुर्भाव केला आहे. त्यामुळे उत्पादनही घट होणार आहे. कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत असताना उल्हासने स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा असा आप्तपरिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suicide of a young farmer