गोंदियात स्फोटके जप्त, सुकमासारखी दुर्घटना टळली

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

छत्तीसगडच्या सुकमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांवर गोळीबार केल्याच्या घटनेनंतर राज्याच्या नक्षलग्रस्त सीमावर्ती भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. बॉम्बविरोधी पथकाने ही स्फोटके निकामी केली. 

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भरनौली गावाजवळ पोलिसांनी सोमवारी (ता. 24) रात्री स्फोटके जप्त केली. नक्षलवाद्यांनी फलकावरून दिलेल्या जाहीर धमकीनंतर गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली. याच फलकाजवळ नक्षल्यांनी पेरलेला टाईमबाँब मिळाला.

गोंदिया व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. छत्तीसगडच्या सुकमा येथे माओवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांवर गोळीबार केल्याच्या घटनेनंतर राज्याच्या नक्षलग्रस्त सीमावर्ती भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. बॉम्बविरोधी पथकाने ही स्फोटके निकामी केली. 

संशयित कार्यकर्ता ताब्यात 

नक्षलसमर्थक असल्याच्या संशयावरून गोंदियातून एका मानवाधिकार कार्यकर्त्यास मंगळवारी (ता. 25) पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सदर कार्यकर्ता गडचिरोली येथील रहिवासी असल्याचे समजते.

Web Title: sukma like attack foiled, explosives seized in gondia